सेवाभावी संस्था • २००८ पासून कार्यरत • नोंदणी २०१९

विद्या विनयेन शोभतेगुरुकुल आश्रम, आळंदी देवाची

आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अनाथ आणि गरीब विद्यार्थ्यांना पारंपरिक वारकरी शिक्षण देणे हे संस्थेचे मुख्य ध्येय आहे. अनाथ मुलांसाठी संपूर्ण शिक्षण मोफत असून गरीब विद्यार्थ्यांकडून माफक शुल्क घेतले जाते.

गुरुकुलातील विद्यार्थ्यांची ज्ञानेश्वरी पाठ तालीम
ज्ञानेश्वरी पाठ वर्गातील तालीम
२००८
पासून कार्यरत
२०१९
अधिकृत नोंदणी
१००%
अनाथ मुलांसाठी मोफत
माफक
गरीब विद्यार्थ्यांसाठी शुल्क

वैशिष्ट्ये व ध्येय

गुरुकुलाची ३ मुख्य तत्त्वे

०१

मोफत शिक्षण व निवास

अनाथ विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण शिक्षण, निवास व भोजन पूर्णपणे मोफत. गरीब विद्यार्थ्यांकडून केवळ माफक शुल्क.

०२

पारंपरिक वारकरी शिक्षण

ज्ञानेश्वरी पाठ, कीर्तन, प्रवचन, पखवाज व वीणा वादन आणि संत साहित्याचे शुद्ध संस्कार.

०३

स्वावलंबन व शिस्त

पहाटेपासून रात्रीपर्यंत शिस्तबद्ध दिनचर्या, योग, अभ्यास आणि सेवा यातून घडणारे चारित्र्य.

संस्थेचे संस्थापक महाराज

संस्थापक

महाराजांचा जीवनप्रवास

महाराज स्वतः दृष्टीहीन आहेत. अत्यंत गरिबी आणि प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी निवृत्तीनाथ महाराज वक्ते बाबा आणि खांडे महाराज यांच्याकडून वारकरी संप्रदायाचे शिक्षण व प्रशिक्षण घेतले.

२००६ मध्ये ते आळंदीत आले आणि २००८ पासून गरजू विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली. २०१९ मध्ये संस्थेची अधिकृत नोंदणी झाली.

दैनंदिन दिनचर्या

आश्रमातील विद्यार्थ्यांचे वेळापत्रक

  • ०५:३०जागरण
  • ०५:३० – ०६:३०वैयक्तिक अभ्यास आणि योग/व्यायाम
  • ०६:३०सामुदायिक प्रार्थना आणि सकाळचा धडा
  • ०९:०० – १०:००न्याहारीनंतर सकाळचे सत्र
  • १०:००दुपारचे जेवण
  • १०:३० – १७:३०औपचारिक शालेय वर्ग
  • १८:००संध्याकाळचा हरिपाठ व कीर्तन
  • २०:००रात्रीचे जेवण व स्वाध्याय
  • २२:३०शयन

अभ्यासक्रम

येथे काय शिकवले जाते

ज्ञानेश्वरी व संत साहित्य

मूळ ओवी पाठांतर, अर्थ आणि निरूपण.

कीर्तन व प्रवचन

वारकरी परंपरेतील कीर्तन शैली आणि वक्तृत्व.

पखवाज, वीणा व टाळ

भजनी वाद्यांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण.

शालेय शिक्षण

औपचारिक शालेय अभ्यासक्रमाची पूर्ण सोय.