🚩श्रद्धा, शिस्त आणि मोफत शिक्षण

आमच्याबद्दल

ज्ञानराज सेवाभावी संस्था — गुरुकुल आश्रम, आळंदी देवाची — २००८ पासून कार्यरत आहे. वारकरी परंपरेचे जतन करत अनाथ व गरीब मुलांना घर आणि विनामूल्य सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी संस्था समर्पित आहे.

संपर्क साधा

आमचे ध्येय आणि उद्देश

नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥

आमचे ध्येय

आमचे ध्येय

अनाथ आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, सुरक्षित निवास आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना स्वावलंबी आणि सक्षम नागरिक बनवणे.

आमचे व्हिजन

आमचे व्हिजन

कोणतेही अनाथ किंवा गरीब मूल शिक्षणापासून वंचित राहू नये आणि वारकरी ज्ञानाचा ‘ज्ञानदीप लावू जगी’ हा प्रकाश पुढील पिढ्यांसाठी अखंड तेवत राहावा, असा संवेदनशील समाज घडवणे.

आमचे ध्येय आणि उद्दिष्टे

ध्येय आणि उद्दिष्टे

ध्येय

अनाथ आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, सुरक्षित निवास आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना स्वावलंबी आणि सक्षम नागरिक बनवणे.

उद्दिष्टे

  • 01अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व निवासाची सुविधा देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे.
  • 02अनाथ व गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय व अध्यात्मिक शिक्षणाची जोड देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणे.
  • 03विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, शिस्त आणि नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी विविध क्रीडा, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करणे.
  • 04विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक समृद्धीसाठी विद्यार्थ्यांना कीर्तन, प्रवचन आणि मृदंग वादन यांसारख्या पारंपारिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कलांचे शिक्षण देऊन त्यांच्या शालेय शिक्षणासोबतच सर्वांगीण विकास घडवून त्यांना भारताचे सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक बनवणे.

आमची मूल्ये आणि दृष्टीकोन

आम्ही जपणारी तत्त्वे

श्रद्धा आणि परंपरा

आम्ही संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या समृद्ध वारकरी परंपरेचे व आध्यात्मिक वारशाचे जतन आणि संवर्धन करतो.

शास्त्रीय कीर्तन शिक्षण

आमचा ४ वर्षांचा कीर्तन अभ्यासक्रम आणि ६ वर्षांचा शास्त्री-आचार्य गुरुकुल पद्धतीचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अध्यात्मिक व शास्त्रीय पाया देतो.

करुणा आणि सेवा

आम्ही अनाथ आणि गरीब मुलांना विनामूल्य शिक्षण देतो.

चरित्र निर्मिती

प्रार्थना, रियाज, अभ्यास आणि सेवेची शिस्तबद्ध दिनचर्या प्रत्येक विद्यार्थ्यात नैतिक मूल्ये आणि चारित्र्य घडवते.

मृदंग आणि शास्त्रीय संगीत

मृदंग (पखवाज) वादनासह शास्त्रीय आणि सुगम गायनाचे विशेष प्रशिक्षण दिले जाते.

समावेशकता आणि समानता

पार्श्वभूमी किंवा आर्थिक क्षमतेचा भेद न करता प्रत्येक मुलाला समान निवास, भोजन आणि शिक्षण दिले पाहिजे.

श्री ह.भ.प. रमेश महाराज शिंदे, संस्थापक

संस्थापकांचा प्रवास

प्रज्ञाचक्षू श्री ह.भ.प. रमेश महाराज शिंदे, संस्थापक

संस्थापक — ज्ञानराज सेवाभावी संस्था

जन्मापासून दृष्टिहीन असलेले संस्थापक श्री ह.भ.प. रमेश महाराज शिंदे अत्यंत गरिबीत वाढले. त्यांनी श्री. ह.भ.प. निवृत्तीनाथ महाराज वक्ते बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी परंपरेचे शिक्षण घेतले. २००६ मध्ये ते आळंदीत आले आणि २००८ पासून गरजू विद्यार्थ्यांना शिकवू लागले. या सेवेतून ज्ञानराज सेवाभावी संस्थेचा गुरुकुल आश्रम उभा राहिला. आज येथे चार वर्षांचा कीर्तन अभ्यासक्रम आणि सहा वर्षांचा शास्त्री-आचार्य गुरुकुल अभ्यासक्रम चालतो. अनाथ व गरीब मुलांना येथे विनामूल्य शिक्षण, निवास, शिस्त आणि पारंपरिक ज्ञानाचा प्रकाश दिला जातो.

  • ज्ञानेश्वरी, तुकोबारायांचे अभंग व माऊलींचा हरिपाठ यांचे जतन व प्रसार.
  • मृदंग (पखवाज) आणि शास्त्रीय/सुगम गायनाचे मोफत प्रशिक्षण.
  • अनाथ आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य शिक्षण.
  • प्रार्थना, रियाज, शाळा आणि सेवेची शिस्तबद्ध दिनचर्या.

प्रवेश घ्या

प्रवेश माहिती

पात्रता

इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश खुले आहेत.

आवश्यक कागदपत्रे

  • विद्यार्थी व पालकांचे आधार कार्ड
  • ४ पासपोर्ट आकाराचे फोटो
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • मृत्यू प्रमाणपत्र (अनाथ / एकल पालक मुलांसाठी)

संख्यांमधील आमचा प्रवास

श्रद्धा, शिस्त आणि मोफत शिक्षण

2008
कार्यरत वर्ष
4 & 6
वर्षांचे अभ्यासक्रम
100%
अनाथांसाठी मोफत

सहभागी व्हा

आमच्या मिशनचा एक भाग व्हा

तुका म्हणे संत सेवा । हेच देवा उत्तम ॥ आपले सहकार्य आम्हाला अधिक मुलांना शिक्षित करण्यास आणि सामाजिक कार्य उभारणीस मदत करू शकते.

संपर्क साधा